हा पतंग रंगित पहा निळा
बागडे कसा अंबरी खुळा
वायु संगे वर वर चढतो
हिसका देता खाली येतो
सैल सोडिता मज धाववितो
लावितो मला फार हा लळा ।
उडतांना हा उंच खरोखर
गमतो मजला शतपट सुंदर
ईर्षेने खग उडती वरवर
पण थांब पतंगा सरे रिळा ।
पतंग अन् मी गच्ची वरती
घेउनि चकरी आणिक लई ती
उडवी मांजा लावुनि पुढती
लढवि ना कुणी पेच आगळा ।(कविता ऐका)
हवे पतंगा सम ते जीणे
क्षण दो क्षण बालका रमविणे
आणि स्वत: ही नभी बागडणे
वाहते सौख्य यांत खळखळा ।
शरद काळे
ग्वाल्हेर
१९५५
Monday, September 29, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
अतिसुंदर आशाताई....
कवितेतला विचार छान आहे...आणि आपला आवाजही...मनापासून आवडले...मनापासून आलेली दाद आहे ही...
pharach sundar! shalet gelya sarakhe vatale.
anil manavi
Post a Comment