ऋतुरंग प्रस्तावना ऋतुरंग ह्या डॉक्टर शरद काळे ह्यांच्या काव्य संग्रहाचं हे मल्टिमीडिया सादरी करण आहे. हा काव्य संग्रह पुस्तक स्वरूपांत, कल्पना मुद्रणालय पुणे ह्याच्या तर्फे, 1997 साली मुद्रित होवून 27 डिसेंबर,1998 साली जेष्ठ कवयित्री श्रीमति अनुराधा पोतदार ह्यांच्या हस्ते प्रकाशित झाला. त्या वेळी श्री ना.स. इनामदार, हे ऐतिहासिक संशोधक आणि कादंबरीकार, ज्यांनी ह्या काव्य संग्रहाला प्रस्तावना ही लिहिली आहे, उपस्थित होते. त्यांनी ह्या कार्यक्रमाचं सभापतित्व ही स्वीकारलं होतं . तसेंच प्रसिध्द कवयित्री सौ. हेमा लेले, ह्यांनी ह्या काव्य संग्रहाचं रस ग्रहण केलं . ह्या मल्टीमीडिया सादरी करणांत ह्या संग्रहातील सर्व कविता आहेत. ह्या संग्रहाचं वर्णन करायचं झालं तर संग्रहाचया नावांतच ते आहे. जीवनातील विविध रंग दर्शवणा-या ह्या कविता ऋतुरंग ह्या नावाला सार्थ करतात. मराढी माणसाच्या खास अशा सांस्कृतिक चळवळी मधून मातृभाषा जपण्याचा जो प्रयत्न बृहन्महाराष्ट्रीय सतत करीत असतो त्याचेच प्रत्ययीकरण म्हणजे डॉ. शरद काळे ह्यांचा हा काव्य संग्रह आहे . ह्या संग्रहातील कविता कांही हलक्या फुलक्या असल्या तरी काहीं गंभीर आणि सार-गर्भित आहेत जीवनाचंच नव्हे तर जीवनाच्या शेवटाचं ही दर्शन ह्या कविता घडवितांत. पेशाने डॉक्टर पण मन कविचं. टाटानगर च्या मेडिकल कॉलेजांत प्राध्यापक पण त्यातूनही कविते साठी वेळ काढणारा. “दवडला जन्म शब्द वेचण्यात रोग निदानार्थ वेळ नाही “अशी प्रांजळ कबूली देणारा शब्दवेडा डॉक्टर .उघड्या डोळ्यांनी कविचा मृत्यु बघत, “आलिया भोगासी सावे सादर “ असे म्हणणारा. निर्जीवांतही सजीवाच्या भावना ओतणारा आगळा वेगळा कवि. लहानपणा पासून कवितां करायचं अत्यंत वेड अन् त्या कविता बहीण भाऊ आई वडिल ह्यांना ऐकवून त्यांच्या पसंतीचं शिक्का मोर्तब झाल्या खेरीज चैन कसं ते पडायचं नाही. कवितेंत येणा-या उपमा अगदी रोजच्या व्यवहारातल्या पण उपयोग नवीन कि वाटावं अरे हे आपल्याला कां बरं सुचु नये .
पोलकं कवितेतल्या प्रौढ कुमारिकेची व्यथा दर्शविणा-या ह्या ओळी पहा, “ हिरवी स्वप्ने पहात गपचिप जगतं एखाद्या दिवशी अचानक बिथरतं अन् हळदी च्या अतृप्त इच्छेने विरतं.”
किंवा कवि अन् वेदना ह्यांचं कसं अजोड नातं आहे ते दर्शविणा-या ह्या ओळी. अन् असह्य जवळिक ही आंत सूर्य कवि अंतर काष्ठा सम कवि देहा ज्वलन हेच गत्यंतर
अन् त्या वेदना कशा सोसायच्या तर
विपदांचे जहर जरी लिहिले असले दैवी संजीवक ते ठरण्या मीरेची वृत्ती हवी अन् ह्याच मीरेच्या वृत्तीनं जीवन अन् मृत्यु दोनही प्रसंगांना सामोरं जातांना जे कांहीं उमटले ते हे ऋतुरंग .
एक सामान्य भारतीय स्त्री. दिल्लीत नोकरी केली
१९९९ पर्यंत. तेव्हापासुन मुलांकडे अमेरीकेत व दिल्लीला वेळ वाटणी. कविता लिहिण्याची अन इतरांना दाखविण्याची हौस ही पारिवारिक देणगी.झुळुक ह्या
ब्लाग वरील सा-या कविता माझ्याच. त्यांच्या सजावटीचं श्रेय मात्र माझे पती सुरेश जोगळेकर ह्यांचं. आमचे कंम्प्यूटर एक्सपर्ट तेच. तुमचा अभिप्राय अवश्य कळवा.
ऋतुरंग हा माझ्या दादाच्या (डॉ. शरद काळे ह्यांच्या) कवितांचा ब्लॉग. दादाच्या कविता अगदी वेगळ्याच आहेत त्या पुस्तक रूपानंही प्रसिध्द झाल्या आहेत पण त्या ब्लॉग वाचकांना खचित आवडतील हा विश्वास आहे. दादा पेशानं डॉक्टर पण ह्रदय कविचं ते सारं तुम्हाला त्याच्या कवितांतच दिसेल. पण वाचा नक्की अन् अभिप्राय आवडेलच. दादा नाही न आता म्हणून मीच करतेय हे.